आमच्यासोबत का काम करावे

BMT Drive Solutions हा कौटंबिक मालकी व्यवसाय असून येथे सदैव उच्च तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यास प्राधान्य दिले जाते. आम्ही आव्हानात्मक स्थितीला न घाबरता सामोरे जावून त्यातून नवीन मार्ग शोधतो. आमच्या कंपनीमध्ये प्रत्येक कर्मचारी जबाबदारीने भुमिका पार पाडतो याची आम्हाला खात्री आहे. आज आम्ही जिथे आहोत ते आमच्या कष्टाळू कर्मचाऱ्या मुळेच आहोत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही एक सर्वांसाठीं खुली वैविध्यपूर्ण संस्कृती विकसित केली आहे.  अशा या ध्येयप्रेरित कुटुंबाचा आपण एक भाग होवू इच्छित असाल व आपल्या कारकीर्दीचा एक नवीन दिशा देऊ इच्छित असाल तर हि एक आपल्यासाठी चांगली संधी असल्यामुळे आपण याकरिता अर्ज करा. आमचा पुणे येथील हा एक नाविन्यपूर्ण उच्च तंत्रज्ञान प्रकल्प असून येथे आपण आपल्या कारकिर्दीचा एक मजबूत पाया तयार करू शकता. आम्ही सतत ग्राहकांच्या अपेक्षा पूर्तीसाठी झटत असतो आणि त्यांच्या यशातुनच आमचे यश व प्रगती सुनिश्चित करतो.

“कंपनी ही माझ्या कुटुंबासारखीच आहे”

Shekhar Namdev Chorghe